Pune Lunch Date Banner

लेवा पाटीदार समाजाचं पुणे लंच डेट इव्हेंट संपन्न

14 डिसेंबर 2025

कॅनडा स्थित श्री राजीव चौधरी यांच्या संकल्पनेतून घेण्यात येणारा अतिशय महत्त्वाचा, आगळा वेगळा असा लेवा पाटीदार समाजाच्या मुलामुलींसाठी चौथा डेट इव्हेंट आणि पुण्यातील तिसरा "पुणे लंच डेट इव्हेंट" दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी पुण्यात अतिशय उत्साहात आनंदात पार पडला.

यावेळी विवाह इच्छुक मुला मुलींनी लक्षणीय सहभाग घेतला. या वेळी एकूण मुलींची संख्या 29 तर मुलांची संख्या 45 आधीच रजिस्ट्रेशन झालेली होती. स्पॉट रजिस्ट्रेशन 5 झाले. या इव्हेंटची खासियत म्हणजे यात पालकांना प्रवेश नव्हता त्यामुळे मुलं मुलींना एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधता आला.

Pune Lunch Date Event

टेबल टू टेबल अशी अरेंजमेंट असल्यामुळे आणि यात मुलांना त्याच ठिकाणी स्थिर ठेवून मुलींना डिस्कशन संपल्यानंतर दुसऱ्या टेबलवर चर्चेसाठी पाठवण्यात येत होतं त्यामुळे नियोजन अतिशय सुंदर झालं.

या उपक्रमाच्या कोऑर्डिनेटर नाशिक येथील समाजसेविका सौ नीलिमा राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत सर्व उमेदवारांशी सहानुभूतीने आणि खेळीमेळीने वारंवार संपर्क साधत बोलते केले... त्यामुळे सभागृहात सर्वदूर आनंदमयी आणि हसतखेळत चर्चांचे वातावरण दिसून आले.

कार्यक्रमासाठी स्वतः राजीव चौधरी हजर होते. कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन कोऑर्डिनेटर सौ नीलिमा राजेंद्र पाटील, व्हाट्सअप मॅट्रिमोनी या बहुचर्चित उपक्रमाचं सातत्यानं, स्तुत्य नियोजन करणाऱ्या सौ प्रतीक्षा नारखेडे, संभाजीनगर वरून प्रोग्रामिंग एक्सपर्ट श्री विनय चौधरी, जळगाव वरून श्री संकेत पाटील, डॉ. सुशांत पाटील, वैभव बऱ्हाटे, लुब्धा बऱ्हाटे, पवन बऱ्हाटे यांनी केलं. यावेळी वेब डिझाइनर श्री निलेश पाटील आणि महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ मिलिंद पाटील, जळगाव हे आमंत्रित सदस्य म्हणून उपस्थित होते.

या उपक्रमासाठीचे प्रायोजकत्व स्वतः राजीव चौधरी यांनी मोठा वाटा स्वीकारत 20 मुलींचे तर इतर महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ, लेवा शुभयोग, डॉ चंद्रकांत वाघुळदे यांचे ओम ज्योतिषालय,, स्किन हेव क्लिनिक यांनी सुद्धा प्रायोजकत्व स्वीकारले होते. इच्छुक वरांना नाममात्र सहभाग शुल्क आकारण्यात आले होते.

सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या या उपक्रमात सकाळी कोल्ड ड्रिंक, नाश्ता, टोरेन्टो वडापाव टेबलवरच देण्यात आला...नंतर दुपारी जेवणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली...या ठिकाणी सुद्धा मुलामुलींची चर्चा चालू राहील अशी व्यवस्था करण्यात आली होती.

या कार्यक्रमाचे आकर्षण ठरलेली श्री राजीव चौधरी यांची खास रेसिपी टोरेन्टो वडापाव ...त्यांनी संशोधन करून बनवलेल्या मसाल्यातून हॉटेल चालक यांनी वडापाव तयार करून दिला होता. त्याची लज्जत सर्वांनी चाखली.

👉 शब्दांकन आणि कोलाज: डॉ मिलिंद पाटील, जळगांव